Jump to content

धन्नी गाय

धन्नी किंवा धानी बैल
धन्नी किंवा धानी बैल

धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.[][]

शारीरिक रचना

हा गोवंश आकाराने मजबूत आणि मध्यम असतो. या गोवंशाचे डोके तुलनेने लहान असते. पाठीचा आकार सरळ आणि सपाट असतो. कातडी घट्ट असून शरीराला चिटकलेली असते. या गोवंशाची शिंगे आकाराने लहान असतात. कान छोटे, टोकदार आणि नेहमी सतर्क असतात. शेपटी लांब आणि झुपकेदार असून शेपटीचा गोंडा पांढरा असतो.

या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची १४० सेंमी असून वजन ४०० किलो पर्यंत असते. तर गायीची सरासरी उंची १२० सेंमी आणि वजन १३० किलो पर्यंत असते.

वैशिष्ट्य

हा गोवंश विविध प्रकारच्या रंगात आढळतो, परंतु पांढरा रंग आणि काळे किंवा लाल ठिपके जास्त प्रमानात आढळतो.

या गोवंशाच्या वेगवेगळ्या रंगानुसार त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

पांढऱ्या रंगावरील काळ्या ठिपक्याच्या गायीला चित्तबुर्गा असे म्हणतात काळ्या रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला कालाबुर्गा असे म्हणतात. तपकिरी आणि काळ्या रंगावर पांढरे ठिपके असल्यास त्याला नुक्कारा असे म्हणतात. लाल रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला रक्तबुर्गा असे म्हणतात.[]

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[] परंतु चांगली काळजी घेतली असता या गोवंशाच्या गायी दिवसाकाठी ८ ते १० लिटर दुध देऊ शकतात.

भारतीय गायीच्या इतर प्रजाती

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Bajpai, Diti. "ये हैं भारत की देसी गाय की नस्लें, जिनके बारे में आप शायद ही जानते होंगे" (हिंदी भाषेत). 2020-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Khan, Bakhat B. (2011-11-13). "Breeds of Livestock in Pakistan - AgriHunt". Agrihunt.pk. 23 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Muhammad Aslam. "Dhanni Cattle" (PDF). Fangrpk.org. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 5 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.