धनेश
धनेश (शास्त्रीय नाव: Bucerotidae, ब्यूसेरोटिडी ; इंग्लिश: Hornbill, हॉर्नबिल ;) हे आफ्रिका, आशिया व मेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे पक्ष्यांचे कुळ आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.
मराठी नावे
'धनेश' या संस्कृत नावाने परिचित असलेल्या ह्या पक्ष्याला रत्नागिरीत गरुड, सिंधुदुर्गात माडगरुड तर दापोली-मंडणगडमध्ये ककणेर अशी नावे आहेत.
कोकणामधे काही ठिकाणी हॉर्नबील ह्या पक्षाला काकण पण म्हणतात.
हे सुद्धा पहा
- राखी धनेश
- मलबारी धनेश अथवा राज धनेश
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- 'बर्ड्ज ऑफ इंडिया' संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)