Jump to content

धनेगाव (नांदेड)

धनेगाव हे महाराष्ट्रराज्यातील नांदेड शहराच्या बाजूला वसलेले मोठे गाव आहे.

शहरा पासून अवघ्या 8 कि.मी.अंतरावर असलेली गाव तसेच नांदेड जिल्हातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिणेला पुर्व-पश्चिम अशा लंब आकारात वसलेले गाव आहे.

मराठवाड्यातील कापसाचे संशोधन केंद्र धनेगाव येथे आहे.या ठिकानी कापसावर प्रक्रिया करून नवीन संकरित वाण तयार केले जाते व संशोधन केल्या जाते.

धनेगाव हे नांदेड-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग व नांदेड-लोहा या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेले गाव आहे.

धनेगावची 2011 जणगणनेनुसार 7500 पेक्षा जास्त आहे.

एकूण लोकसंख्या -7690

एकूण मतदार - 4030

0-6 वयोगटातील संख्या - 1540

लिंग गुणोत्तर -1000/918

बाल लिंग गुणोत्तर -1000/836

एकूण साक्षरता - 72.30%

पुरूष साक्षरता -89.86%

स्त्रि साक्षरता - 71.62%

2011 या जणगणनेनुसार धनेगाव मध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात..

1) हिंदू-41%

2) मुस्लिम -18%

3) बौद्ध - 26%

4) शीख - 0.6%

5) जैन - 0.3%

6) इतर 0.6%

धनेगाव मधील "तीनशिव'' हणुमाण मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिराची विशेषतः हे मंदिर तुप्पा,धनेगाव,बळीरामपूर येथील लोंकाचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे.या मंदिराची स्थापना 1929 या वर्षी करण्यात आली.

धनेगाव मध्ये "विठ्ठल-रुक्मिनी'',रेणूकामाता व गणपतीची मंदिरे आहेत.

धनेगाव मध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बौद्ध विहाराची संख्या खुप आहे, तसेच धनेगाव मध्ये 2017 या वर्षापासून बौद्धधम्म परिषद भरविण्यात येत आहे ही धम्म परिषद अल्पवधितच प्रसिद्ध झालेली आहे.

धनेगाव हे अनेक समुदायाचे शांततेणे राहणारे व सामाजिक सलोखा जपणारे गाव म्हनुन या गावची ख्याती आहे.

गावामधील होणारे तंटा-वाद तंटामुक्ती अंर्तगत सोडवण्यात येतात.

धनेगाव पासून अवघ्या 1 कि.मी.अंतरावर ग्रामिण पोलीस स्टेशन आहे.

धनेगावास विष्णूपुरी येथील "शंकरसागर''जलाशयातुन पाण्याचा पुरवठा केला जातो.

धनेगाव हे शहराच्या जवळील ठिकाण असल्यामुळे या गावात बाहेरील लोंकाचे वस्तीस्थान झाले आहे.व गावचा विकास व आकार वाढला आहे.

धनेगाव येथील लोंकाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी येथील

40% लोकसंख्या शासकीय नौकरदार आहे.

15% शेतकरी व 30% कामगार आहेत.

धनेगाव मध्ये श्री.मधुबण महाराज महाविद्यालय तसेच महात्मा फुले प्राथमिक शाळा व जि.प.शाळा ई. शैक्षणिक सुविधा आहेत.

धनेगाव हे नांदेड जिल्हातील राजकारण्याच्या द्रष्टीने महत्त्वाचे गाव आहे.

येथिल तरुण वर्ग राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतात.

धनेगाव पिन कोड -431603