धनुष्यकोडी अथितन
धनुष्यकोडी अथितन (जन्म:मार्च ६, इ.स. १९५३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते इ.स. १९८५च्या पोटनिवडणुकीत आणि इ.स. १९८९,इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूचेंदूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते तमिळनाडू राज्यातीलच तिरूनेलवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.