धनबाद
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ | |
भारतामधील शहर | |
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे झारखंडमधील स्थान | |
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे भारतमधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | झारखंड |
जिल्हा | धनबाद जिल्हा |
क्षेत्रफळ | ५७७ चौ. किमी (२२३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२८ फूट (२२२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ११,६२,४७२ |
- महानगर | ११,९६,२१४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
धनबाद (संताली: ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १४६ किमी ईशान्येस व कोलकात्याच्या २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनबादची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख होती.
धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे भारताची कोळसा राजधानी असा खिताब धनबादला देण्यात येतो.
वाहतूक
धनबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-गया-हावडा ह्या प्रमुख लोहमार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे १०० गाड्या थांबतात. धनबाद येथे पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागाचे मुख्यालय देखील आहे. दिल्ली-कोलकातादरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग २ धनबादमधूनच जातो. सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३२ धनबादला जमशेदपूरसोबत जोडतो.
हे सुद्धा पहा
- धनबाद (लोकसभा मतदारसंघ)