धन विधेयक
संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयके ,घटना दुरुस्ती विधेयके किंवा धनविधेयके असू शकतात . विधेयक हे धनविधेयक असल्यास त्याची संसदीय कार्यपद्धती बदलते .धनविधयेक म्हणजे - धन किंवा अर्थ म्हणजे पैसा , साध्या भाषेत पैशांशी संबंधीत विधीयके म्हणजे धनविधेयक किंवा अर्थविधयेयक होय, घटनेच्या ११०व्या कलमात धनविधयेयकाची व्याख्या दिलेली आहे -करबाबी ,शासनाचे कर्ज,तारण,संचित निधी,आकस्मिक निधी,संचित निधीतील प्रभारित खर्च ,लेखे,लेखापरीक्षण , इत्यादी संबधीत बाबींचा उल्लेख असणाऱ्या विधेयकास धनविधेयक म्हणतात.
धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धत
१) १०९ व्या कलमानुसार धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडली जाते .
२) धनविधेयक सुरुवातीला लोकसभेत मांडले जाते ,ते राज्यसभेत मांडता येत नाही
३) लोककसभेने संमत केल्यानंतर धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते ,राज्यसभेला सदर धनविधेयक १४ दिवसाच्या आत सूचनांसह किंवा सूचनाव्यतिरिक्त लोकसभेकडे परत पाठवावे लागते .
४) लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्यास सदर धनविधेयक राज्यसभेमध्ये संमत केले आहे ,असे समजले जाते लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्या नाहीत तरीसुद्धा सदर धनविधेयक राज्यसभेत संमत केले आहे ,असे समजले जाते .