Jump to content

द्विनाम पद्धती

लिनियसच्या पुस्तकाचे पहिले पान

सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांना नाव देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात. वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचा गोंधळ त्यामुळे होत नाही. जीवांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करतांना त्यांना वैश्विक नावे देता येतील अशी कल्पना कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या आद्य जीवशास्त्रज्ञाने प्रथम मांडली.

त्यानुसार इ.स.१९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत सजीवांना शास्त्रीय द्विनाम देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती स्वीकारली गेली. त्यानंतर वाढत जाऊन ही त्री नाम पद्धती पर्यंत विकसित झाली. या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला जीववर्गीकरणशास्त्र असे म्हणतात. द्विनाम पद्धतीत प्रत्येक वनस्पती जातीला दोन अथवा तीन नावांनी ओळखण्याची पद्धत आहे. रोमन लिपीत लिहितांना यामध्ये प्रमुख प्रजातीचे पहिलं अक्षर मोठे लिहितात आणि वैशिष्ट्याचे पहिले अक्षर लहान लिहितात. तिसरे नाव त्यानंरची उप-जाती सांगते. जर उप-जात नसेल तर पहिली दोनच नावे लिहिली जातात.

हे सुद्धा पाहा