Jump to content

द्वारकानाथ माधव पितळे

द्वारकानाथ माधव पितळे
जन्म नाव द्वारकानाथ माधव पितळे
टोपणनाव नाथमाधव
जन्मएप्रिल ३, इ.स. १८८२
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यूजून २१, इ.स. १९२८
मुंबई, ब्रिटिश भारत
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी

द्वारकानाथ माधव पितळे, ऊर्फ नाथमाधव, (एप्रिल ३, इ.स. १८८२; मुंबई, ब्रिटिश भारत - जून २१, इ.स. १९२८; मुंबई, ब्रिटिश भारत) हे मराठी कादंबरीकार होते.

केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. नाथमाधव हे एक उत्तम शिकारी होते.

जीवन

द्वारकानाथ माधव पितळे यांचा जन्म एप्रिल ३, इ.स. १८८२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर [] पितळ्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली. नोकरी करत असताना त्यांना शिकारीची आवड निर्माण झाली. इ.स. १९०५ सालच्या मे महिन्यात सिंहगडाच्या परिसरात शिकारीस गेले असताना, टेहळणी करता करता ते कड्यावरून खाली कोसळले []. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालील भाग लुळा पडला. रुग्णालयात चैद्यकीय उपचार घेत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. या काळात त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांतील अनेक ग्रंथ वाचून काढले []. या वाङमयाभिरुचीतून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही इ.स. १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. (१९५९). शहरी-ग्रामीण असे दोन्ही वातावरण असलेल्या या सामाजिकपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

कारकीर्द

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
ग्रहदशेचा फेराकादंबरीइ.स.
डॉक्टर (३ भाग)कादंबरीइ.स. १९१८-२०
देशमुखवाडीकादंबरीइ.स. १९१६
दोन भावंडेकादंबरीइ.स.
प्रेमवेडाकादंबरीइ.स. १९०८
भविष्य प्रचितीकादंबरीइ.स.
मालती माधवकादंबरीइ.स.
रायक्लब अथवा सोनेरी टोळीकादंबरीइ.स. १९१५ (पूर्वार्ध)
इ.स. १९२४(उत्तरार्ध)
विमलेची ग्रहदशाकादंबरीइ.स. १९१७
विहंगवृंदकादंबरीइ.स.
वीरधवलकादंबरीइ.स. १९१३
शरयूकादंबरीइ.स.
सापत्‍नभावकादंबरीइ.स.
सावळ्या तांडेलकादंबरीइ.स. १९०९
सुहासिनीकादंबरीइ.स.
स्वयंसेवककादंबरीइ.स.
स्वराज्याचा कारभारकादंबरीइ.स. १९२३
स्वराज्याचा श्रीगणेशाकादंबरीइ.स. १९२१
स्वराज्यातील संकटकादंबरीइ.स. १९२३
स्वराज्याची स्थापनाकादंबरीइ.स. १९२२
स्वराज्याची घटनाकादंबरीइ.स. १९२५ (२री आवृत्ती)
स्वराज्यातील दुफळीकादंबरीइ.स. १९२८
स्वराज्याचे परिवर्तनकादंबरीइ.स. १९२५
हेमचंद्र रोहिणीकादंबरीइ.स. १९०९

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b गुप्ते, चारुशीला. नाथमाधव. मराठी विश्वकोश.
  2. ^ साळगावकर, जयंत. "निमित्तमात्र". २२ जून, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे