Jump to content

दौलतराव श्रीपतराव देसाई

दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई (मार्च १0, इ.स. १९१० - ) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणीउपमुख्यमंत्री होते. यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हाना केव्हा सांभाळली होती. प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.[ संदर्भ हवा ]


बालपण

१० मार्च, १९१० रोजी त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी विहे या गावी झाला. त्यांचे गाव मूळ पाटण तालुक्यातील मरळी आहे. आई दरुबाई त्यांच्या बालपणीच निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खाऊन दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणप्रेमी बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येऊन पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

व्यक्तिमत्त्व

बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे.

व्यावसायिक कारकीर्द

1937 मध्ये बी. ए., एलएल. बी. झाल्यानंतर पाटण आणि कराड येथे त्यांनी वकिली केली.

राजकीय कारकीर्द

शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होते

पाटण तालूका आणि सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्याच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून 1940 मध्ये राजकारणात प्रवेश केला.पाटण तालुक्यातून लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि तत्कालीन प्रस्थापीत ब्रिटिश सरकारमधील धनजी शहा कूपर यांचे प्रस्थ मोडून अध्यक्षपदी निवडून आले. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी सलग बारा वर्षे होते.

मुंबई राज्य

1952 मध्ये पाटण तालुक्यातून विधानसभेसाठी ते बिनविरोध निवडून गेले.1957 मध्ये पुन्हा विधानसभेवरील निवडीनंतर ते बांधकाम मंत्री झाले.

महाराष्ट्र राज्य

1962 मध्ये ते कृषिमंत्री झाले.1978-79 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष होते. (संदर्भ:http://www.dainikaikya.com/20100310/5566917271262061553.htm Archived 2016-03-06 at the Wayback Machine.)

उद्योग समूह

व्यक्तिगत आयुष्य

त्यांच्या पत्‍नीचे नाव वत्सला होते.