Jump to content

दोड्डा कृष्णराज

दोड्डा कृष्णराज
मैसुरुचा १६वा राजा
दोड्डा कृष्णराज
अधिकारकाळ१७१४-१७३२
अधिकारारोहण१७१४
राज्याभिषेक१७१४
राजधानीमैसुरु
जन्म१८ मार्च, १७०२
मृत्यू५ मार्च, १७३२
पूर्वाधिकारीदुसरा कांतीरव नरसराज
दत्तकविधानसातवा चामराज वडियार
उत्तराधिकारीसातवा चामराज वडियार
वडीलदुसरा कांतीरव नरसराज
आईचेल्वजा अम्मनी देवी
पत्नीएकूण ९
संततीबालमृत मुलगा, सातवा चामराज वडियार (दत्तक), दुसरा कृष्णराज वडियार (दत्तक)
राजघराणेवडियार घराणे
धर्महिंदू

पहिला कृष्णराज वोडेयार तथा दोड्डा कृष्णराज (१८ मार्च, १७०२ - ५ मार्च, १७३२) हा मैसुरुचा १६वा राजा होता. हा यदुराय वोडेयारचा शेवटचा थेट वंशज होता. पहिला कृष्णराज १७१४-१७३२ अशी १८ वर्षे सिंहासनावर होा.

पहिल्या कृष्णराजाचा जन्म १८ मार्च १७०२ रोजी झाला. हा दुसरा कांतीरव नरसराज आणि त्याची दुसरी पत्नी महाराणी चेल्वजा अम्मानी देवी यांचा पहिला मुलगा होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ९ वर्षे वयात कृष्णराज मैसुरुचा राजा झाला. याला ९ बायका होत्या. याला स्वतःला एक मुलगा झाला परंतु तो सहा महिन्यांतच मृत्यू पावला. मैसुरुच्या सिंहासनावर कृष्णराय हा यदुरायाचा शेवटचा थेट वंशज होता. याच्यानंतर त्याच्या दत्तक मुलांपैकी एक सातवा चामराज नावाने राजा झाला.

राजवट

दोड्डा कृष्णराजाच्या राज्यारोहणाच्या आधी, मैसुरुच्या उत्तर आणि ईशान्येकडे असलेल्या मुघल साम्राज्याच्या सिरा प्रांतात प्रशासकीय बदल झाला होता. [] यांत मैसुरुच्या आसपास असलेल्या सुपीक प्रदेशाचा महसूल गमावल्यामुळे आर्कोटच्या प्रशासक सादतउल्ला खान याने कडप्पा, कुर्नूल, सावनूर येथील राजे तसेच गुट्टीचा मराठा राजा यांच्या संगनमताने त्याने कृष्णराजाविरुद्ध मोर्चा उभारला. [] तथापि, हा प्रदेश आणि महसूल या युतीच्या घशात पडू नये म्हणून सीराच्या नवाबाने श्रीरंगपट्टणवर स्वतःच चाल केली. [] दोघांचाही मतलब एकच (मैसुरुचा प्रदेश गिळंकृत करणे) असल्याने आर्कोट आणि सिरा या दोन्ही नवाबांनी श्रीरंगपट्टणवर संयुक्त आक्रमण केले. [] आपल्या पूर्वजांप्रमाणे अशा चढाईला प्रत्युत्तर देउन शत्रूला हाकलून देण्याऐवजी कृष्णराजाने १ कोटी रुपयांची खंडणी मान्य केली व मैसुरुवरील हे संकट टाळले.[] परंतु यामुळे मैसुरु हतबल असल्याचे शत्रूला वाटले आणि शत्रू सोकावला. यानंर दोन वर्षांनी मराठा सैन्याने थेट श्रीरंगपट्टणवर हल्ला करून लुटून नेले. [] या सगळ्यामुळे मैसुरुचा खजिना रिकामा होऊ लागला. तो भरण्यासाठी कृष्णराजने उत्तरेच्या मगादीच्या पाळेगारावर हल्ला करून त्याचा प्रदेश मैसुरुमध्ये लावून घेतला. []

वंशज

कृष्णराजाला राज्याच्या कारभारात फारसा रस नव्हता. हे पाहून त्याचा दिवाण आणि चुलतभाऊ नंजरजा आणि सेनापती देवराज यांनी कारभार हाती घेतला. १७३२मध्ये कृष्णराजाच्या मृत्यूनंतर त्यांनी सिंहासनावर आपल्या हातात राहतील असे राजे बसवले. हे हैदर अलीच्या उदयापर्यंत सुरू राहिले.

चित्र:Joppen1907MysoreChickDeoWadiyar1704.jpg
सतराव्या शतकाच्या शेवटी मैसुरुचे राज्य.

नोंदी

  1. ^ a b c d e f g Rice 1897a, pp. 369–370

संदर्भ

  • Wilks, Mark (1811) [1st edition: 1811, volume 1; 1817, volumes 2 and 3; second edition: 1869]. Historical Sketches of the South of India in an attempt to trace the History of Mysoor, Second Edition. Madras: Higginbotham and Co. Pp. xxxii, 527.