Jump to content

दोंगुवान

दोंगुवान
东莞市
चीनमधील शहर


दोंगुवान is located in चीन
दोंगुवान
दोंगुवान
दोंगुवानचे चीनमधील स्थान

गुणक: 23°1′16″N 113°45′07″E / 23.02111°N 113.75194°E / 23.02111; 113.75194

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत क्वांगतोंग
स्थापना वर्ष इ.स. ३३१
क्षेत्रफळ २,४६५ चौ. किमी (९५२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६ फूट (७.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०४,६६,४२५
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.dg.gov.cn/


दोंगुवान (देवनागरी लेखनभेद : दोंग्वान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदीच्या खोऱ्यामध्ये क्वांगचौच्या दक्षिणेस तर षेंचेनच्या उत्तरेस वसले असून २०२० साली दोंगुवान शहराची महानगरी लोकसंख्या सुमारे १ कोटी ४ लाख इतकी होती.

आजच्या घडीला दोंगुवान चीनमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये‎‎ गणली जाते तसेच जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दोंगुवान येथेच बांधला गेला आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील दोंगुवान पर्यटन गाईड (इंग्रजी)