दॉन नदी
दॉन नदी रशियन: Дон | |
---|---|
वोरोनेझ ओब्लास्तमधील दॉनचे पात्र | |
दॉन नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | तुला ओब्लास्त 54°00′43″N 38°16′41″E / 54.01194°N 38.27806°E |
मुख | अझोवचा समुद्र 47°3′39″N 39°17′15″E / 47.06083°N 39.28750°E |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | १,८७० किमी (१,१६० मैल) |
उगम स्थान उंची | २३८ मी (७८१ फूट) |
सरासरी प्रवाह | ९३५ घन मी/से (३३,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४,२५,६०० |
दॉन (रशियन: Днепр) ही पश्चिम रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी तुला ओब्लास्तमधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती अझोवच्या समुद्राला मिळते. वोरोनेझ व रोस्तोव दॉन ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी वोल्गा नदीसोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.
दॉन नदी रशियाच्या खालील ओब्लास्तांमधून वाहते.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत