दैवज्ञ ब्राह्मण
दैवज्ञ हा बहुतांश पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदू ब्राह्मण समाज आहे. ही दैवज्ञ पोटजात गोवा, किनाऱ्यावरील कर्नाटक, तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राची निवासी आहे.[ संदर्भ हवा ] या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हणले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्'चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात अत्रि,कौशिक,भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात.[ संदर्भ हवा ]