Jump to content

दैतापती

दैतापती हे विद्यापती आणि भिल्लकन्या ललिता ह्यांचे वंशज मानले जातात. जगन्नाथपुरीच्या मंदिरात नव्या मूर्तींच्या स्थापनेत दैतापतींचा हात असतो.

पुरीचा राजा इंद्रद्युम्न हा कृष्णभक्त होता. वहात आलेल्या लाकडाच्या ज्या ओंडक्याला श्रीकृष्णाचे शरीर समजून, भिल्लांचा राजा विश्वावसू त्याची पूजा करीत असे, त्या ओंडक्याच्या शोधात एकेकाळी राजाने ब्राह्मणांना वेगवेगळ्या दिशांना पाठविले होते. त्यात विद्यापती नावाचा ब्राह्मण भिल्लांच्या ठिकाणी पोहोचला. ओंडका मिळवण्यासाठी त्याने भिल्लांशी जवळीक करून विश्वावसूच्या मुलीशी - ललिताशी लग्न केले. त्या दोघांची संतती आणि त्यांचे वंशज दैतापती झाले.

बहुधा, श्रीकृष्णाने जगन्नाथाच्या रूपात येण्याअगोदरच ब्राह्मण, शूद्र, यांसारखे जातपात, उच्च-नीच हे भेदभाव संपुष्टात आणण्यासाठीच जणू ब्राह्मण विद्यापतीचा विवाह भिल्ल विश्वावसूची मुलगी ललिताबरोबर लावून सर्वधर्म समताभावाची मुहूर्तमेढ रोवली असावी.[ दुजोरा हवा] मंदिरात श्रीजगन्नाथाची सगळी कामे ब्राह्मणांबरोबर हे दैतापतीही करतात.