Jump to content

देवदीपावली

देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात.

देवदीपावलीचा दिवस हा मुख्यत: चित्पावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो. चित्पावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

उत्तर भारतात

उत्तर भारतात विशेषतः काशीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली असते.[] शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा देवांनी याच दिवशी दीपावली साजरी केली होती, असे सांगितले जाते. या वर्षी (२०१६ साली) काशीमधल्या ८४ घाटांवरती सव्वालाख दिवे उजळवले होते, आणि शिवाय दशाश्वमेघ घाटावरती गंगेची भव्य आरती झाली होती.

  1. ^ Experts, Arihant (2019-07-22). Know Your State Uttar Pradesh (इंग्रजी भाषेत). Arihant Publications India limited. ISBN 978-93-131-9643-3.