Jump to content

देवगिरी एक्सप्रेस

देवगिरी एक्सप्रेसचा फलक
देवगिरी एक्सप्रेसचा मार्ग

देवगिरी एक्सप्रेस (तेलुगू: దేవగిరి ఎక్స్‌ప్రెస్) ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते तेलंगणा च्या लिंगमपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान रोज धावते. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी ह्या ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.

तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१७०५७मुंबई छशिमट – लिंगमपल्ली२१:१०१५:४०रोज५६ किमी/तास९०५ किमी
१७०५८लिंगमपल्ली – मुंबई छशिमट१२:२५०७:१०रोज

प्रमुख थांबे

बाह्य दुवे