देबश्री चौधरी
politician from West Bengal, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ३१, इ.स. १९७१ बालुरघाट | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
देबश्री चौधरी (जन्म ३१ जानेवारी १९७१) ह्या एक भारतीय राजकारणी आहे ज्यांनी मोदींच्या दुसऱ्या मंत्रालयात महिला आणि बाल विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या पश्चिम बंगालमधील रायगंज मतदारसंघातून १७ व्या लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या.[१][२]
चौधरी यांचा जन्म बालुरघाट येथे देबीदास चौधरी आणि रत्ना चौधरी यांच्या पोटी झाला. त्यांनी बर्दवान विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले.[३]
राजकीय कारकीर्द
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा दीर्घकाळ संबंध आहे. त्यांनी युवक आणि महिला विकास क्षेत्रात काम केले आहे.[३] १६ डिसेंबर २०१६ रोजी, कोलकाता येथील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूर उर रहमान बरकती यांनी केलेल्या टिप्पण्यांचा निषेध करण्यासाठी चौधरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सोबत बैसनाबनगरचे आमदार स्वाधीन कुमार सरकार आणि इतर स्थानिक भाजप नेत्यांनाही अटक करण्यात आली.[४] २०१९ च्या पूर्वी चौधरी भाजप कोलकाता दक्षिण उपनगर जिल्ह्याच्या निरीक्षक होत्या.
२०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, चौधरी यांनी रायगंज लोकसभा मतदारसंघातून ५,११,६५२ मतांनी विजय मिळवला. </ref name="News18"> मे २०१९ मध्ये चौधरी महिला आणि बालविकास राज्यमंत्री बनल्या व ७ जुलै २०२१ त्या पदस्त होत्या.[५] सप्टेंबर २०२१ पासून त्या अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण स्थायी समितीच्या सदस्य होत्या.[३]
संदर्भ
- ^ "Raiganj Election Results 2019 Live Updates: Debasree Chaudhuri of BJP Wins". News 18. 23 May 2019. 24 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "Who Gets What: Cabinet Portfolios Announced. Full List Here". NDTV. 31 May 2019. 31 May 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c "Bio of Member of Parliament". www.loksabha.nic.in. 13 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "BJP leaders protest against Shahi Imam, arrested". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 16 December 2016. 13 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "PM Modi allocates portfolios. Full list of new ministers", Live Mint, 31 May 2019, 22 August 2020 रोजी पाहिले