Jump to content

दूर्वा

दूर्वा

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे.[] या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कूळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.[]ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.[]

औषधी गुणधर्म

  • दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे.[]
  • उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो.[]
  • त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो.
  • मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो.
  • रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.[]

धार्मिक महत्त्व

दूर्वा वाहून पूजा केलेला गणपती

हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[] गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात,[] कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते.[] दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.[][१०]

संदर्भ

  1. ^ Śrī Gajānana darśana. Mañjirī Prakāśana. 1976.
  2. ^ Bhutya, R. K. (2011-03-01). Ayurvedic Medicinal Plants of India (Vol. 1) (इंग्रजी भाषेत). Scientific Publishers. ISBN 9789387307315.
  3. ^ a b Sharma, Dr Ravi Prakash, Dr Urmila. Mai Aur Mera Vyakaran B Class 10 (हिंदी भाषेत). Saraswati House Pvt Ltd. ISBN 9789352723850.
  4. ^ Pereira, Winin; Seabrook, Jeremy (2013-11-05). Asking the Earth: Farms, Forestry and Survival in India (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134062461.
  5. ^ Rāje, Prā Ya Bā (1973). Śrigaṇeśapatrī. Dhārmika Prakāśana.
  6. ^ पाण्डे, उमेश; Pandey, Umesh (2016-10-01). चमत्कारिक वनस्पतियॉं: Chamatkarik Vanaspatiyan (Hindi Sahitya) (हिंदी भाषेत). Bhartiya Sahitya Inc. ISBN 9781613016060.
  7. ^ Gaṇeśapurāṇa: Upāsanākhaṇḍa (इंग्रजी भाषेत). Otto Harrassowitz Verlag. 1995. ISBN 9783447036474.
  8. ^ Sadaiv, Shashikant (101-01-01). Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789387980556. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Pereira, Winin; Seabrook, Jeremy (2013-11-05). Asking the Earth: Farms, Forestry and Survival in India (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134062461.
  10. ^ GopalaKrishna, B. T. (2013-02-01). Festivals and Dalits (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781300682622.