Jump to content

दूध कोसी नदी

दूध कोसी नदी नेपाळमधील नदी आहे. एव्हरेस्ट शिखर व परिसराचा दक्षिणेकडील पाण्याचा प्रवाह या नदीतून जातो.

कोसीची उपनदी असलेली ही नदी गोक्यो सरोवराजवळ उगम पावते व नामचे बझार, लुकला या शहरांजवळून वाहत सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेकडून कोसी नदीस मिळते.