Jump to content

दुसरा तिम्मराज वोडेयार

दुसरा तिम्मराज वोडेयार
मैसुरुचा सहावा राजा
अधिकारकाळ७ फेब्रुवारी, १५५३ - १५७२
अधिकारारोहण७ फेब्रुवारी, १५५३
राज्याभिषेक७ फेब्रुवारी, १५५३
राजधानीमैसुरु

]

मृत्यू१५७२
मैसुरु
पूर्वाधिकारीतिसरा चामराज वोडेयार
' चौथा चामराज वोडेयार
उत्तराधिकारीचौथा चामराज वोडेयार
वडीलतिसरा चामराज वोडेयार
संततीनाही
राजघराणेवडियार घराणे

दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता.

विजयनगर पासून स्वातंत्र्य

मैसुरु राज्याच्या स्थापनेपासून ते विजयनगर साम्राज्याचे सामंत राज्य होते. तिम्मराजा सत्तेवर येण्याआधी विजयनगरमध्ये सत्तेसाठी अनेक लोकांमध्ये ओढाताण सुरू होता व त्यात अनेक सम्राटांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या चामराजने विजयनगरपासून स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात काही करण्याआधी त्याचा मृत्यू झाला. १५५३मध्ये तिम्मराजाचा राज्याभिषेक झाल्यावर लगेचच त्याने मैसुरु सार्वभौम राष्ट्र असल्याचे जाहीर केले. विजयनगरवर बहमनी सुलतान आणि मुघल साम्राज्याने उत्तरेकडून सतत हल्ले चालिवल्यामुळे सम्राट रामरायाला याबद्दल फारसे काही करता आले नाही. तिम्मराजाने सुरू केलेली हे सार्वभौमत्वाची हालचाल त्याचा भाऊ चौथ्या चामराजाने पूर्ण केली.