दुसरा ईशानवर्मन
ईशानवर्मन दुसरा (ख्मेर: ឦសានវរ្ម័នទី២១) हा ख्मेर राजवंशाचा सहावा सम्राट होता. ईशानवर्मन इ.स. ९२३ ते इ.स. ९२८पर्यंत सत्तेवर होता.
हा पहिल्या यशोवर्मनचा मुलगा होता.[१] याला परमरुद्रलोक असेही म्हणत.
ईशानवर्मन आणि त्याचा मोठान भाऊ हर्षवर्मन यांनी सत्तेसाठी आपल्या मामा जयवर्मन याच्याशी केलेल्या चढाओढीमुळे याच्या संपूर्ण राज्यकाळात ख्मेरमध्ये शांतता नव्हती. हर्षवर्मनच्या मृत्यूपश्चात ईशानवर्मनने जयवर्मनचा पराजय करून त्यास ख्मेरमधून घालवून दिले.[२]
ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर जयवर्मन सम्राटपदी आला.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Higham, 2001: p.70
- ^ Briggs, The Ancient Khmer Empire, page 115.
- ^ The Khmers, Ian Mabbet and David P. Chandler, Silkworm Books, 1995, page 262.
मागील पहिला हर्षवर्मन | ख्मेर राजवंश इ.स. ९२३-इ.स. ९२८ | पुढील चौथा जयवर्मन |