Jump to content

दुलीपसिंहजी

कुमार श्री दुलीपसिंहजी अर्थात दुलीपसिंहजी (१३ जून, १९०५:काठियावाड, ब्रिटिश भारत - ५ डिसेंबर, १९५९:मुंबई, भारत) हे इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९२९ ते १९३१ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. दुलीपसिंहजी हे इंग्लंडकरता कसोटी सामने खेळलेले दुसरे भारतीय खेळाडू होते. तसेच ते नवानगर संस्थानाचे राजपरिवारातील सदस्य होते.

भारतात नंतर स्थापन झालेली दुलीप करंडक ही प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा यांच्याच स्मरणार्थ सुरू केली गेली.