Jump to content

दुर्बीण

दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास वगैरे.

इतिहास

गॅलिलियो गेलिलेईने दुर्बिणीचा वापर करून ग्रहांची निरीक्षणे घेतली ती ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत, हे सिद्ध केले. दुर्बिणींचा शोध गॅलिलिओ गेलिलिलेईने लावला असे ही म्हंटले जाते. पण काही इतिहासकार दुर्बिणीच्या शोधाचे अधिकृत श्रेय हे जर्मन-डच हान्स लिपरहॉयला (लिपरशे ) देतात. लिपरहॉयने सोळाव्या शतकात नेदरलॅंडमध्ये आपल्या नवीन उपकरणाच्या' पेटंटसाठी अर्ज केला होता. त्यात त्याने या उपकरणातून बघताना दूरची वस्तू जवळ असल्यासारखी वाटते असे नमूद केले. इंग्लंडमधील थॉमस हेरियट याने दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण केले होते. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले.

हौशी दुर्बिणीला कॅमेरा जोडून काढलेले चंद्राचे चित्र

हे सुद्धा पहा