Jump to content

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, अर्थात दु. आ. तिवारी (१६ सप्टेंबर, इ.स. १८८७ - ‌२१ ऑक्टोबर, इ.स. १९३९) हे मराठी कवी होते. मराठ्यांची संग्रामगीते हा काव्यसंग्रह, तसेच मध्ययुगीन कवी भूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या मध्ययुगीन हिंदुस्तानी भाषेतील छंदांचे मराठीतील पद्यानुवाद इत्यादी साहित्यिक रचना त्यांच्या नावावर आहेत.

जीवन

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावचे रहिवासी असलेल्या तिवारींचे घराणे मूळचे उत्तर भारतातल्या रायबरेलीचे []. त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यात हवालदार म्हणून नोकरीस होते, तेव्हापासून त्यांचे घराणे जळगाव परिसरात स्थायिक झाले[]. लहानपणापासून दुर्गाप्रसाद तिवारींना मराठ्यांच्या इतिहासाचे, ऐतिहासिक स्थळांचे आकर्षण होते. त्यातून पुढे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भाने काव्यरचना करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

साहित्यरचना

काव्यसंग्रह

  • मराठ्यांची संग्रामगीते
  • झाशीची संग्रामदेवता
  • राजपूत वीरांगना

दु.आ. तिवारी यांची एक कविता

तळहातीं शिर घेउनिया दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेनाना नामोहरम जहाली
पडली मिठि रायगडाला सोडवितां नाहीं सुटली
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून
परते सरसेनापतिची घोडदौड संताजीची

(अपूर्ण)

संदर्भ

  1. ^ a b पाटील, सोहन. "मराठ्यांची संग्रामगीते". इनसाइड मराठी बुक्स.इन. 22 डिसेंबर 2020 रोजी पाहिले.