दुर्गापूर
दुर्गापूर (चंद्रपूर) याच्याशी गल्लत करू नका.
दुर्गापूर দুর্গাপুর | |
पश्चिम बंगालमधील शहर | |
दुर्गापूर | |
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
जिल्हा | बर्धमान जिल्हा |
क्षेत्रफळ | १५४ चौ. किमी (५९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २१३ फूट (६५ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५,६६,५१७ |
- घनता | ३,७०० /चौ. किमी (९,६०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
दुर्गापूर महापालिका |
दुर्गापूर (बंगाली: দুর্গাপুর) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बर्धमान जिल्ह्यामधील मोठे शहर आहे. दुर्गापूर हे कोलकाता व असनसोल यांच्या खालोखाल पश्चिम बंगाल मधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व राज्यातील स्टील उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा कारखाना भारतामधील प्रमुख आहे. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधन चंद्र रॉय ह्यांनी दुर्गापूर औद्योगिक वसाहतीची संकल्पना केली होती. आज ३०१५ साली येथील औद्योगिक क्षेत्र राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. असनसोल व दुर्गापूर ही जुळी शहरे मानली जातात.
दुर्गापूर हे राष्ट्रीय महामार्ग २ वर कोलकात्याच्या १७० किमी वायव्येस असून येथील रेल्वे स्थानक देखील वर्दळीचे आहे. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दुर्गापूर ही येथील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे.