दुर्गभ्रमण
रावे.्गभ्रमण अथवा ट्रेकिंग करण्यासाठी अनेक भ्रमणमंडळं महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत स्थापन झाली आहेत.हे भ्रमण प्रामुख्याने किल्ल्यांवर किंवा इतर ऊंच डोंगरावर करण्यांत येतं. ट्रेकर मंडळी (भ्रमक?) साधारणतः किल्ल्यावरच्या देवळांमध्ये किंवा इतर इमारतींमध्ये निवारा घेतात. अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्येपण निवारा घेतांत. गावकरी सहसा ट्रेकर लोकांचे स्वागत आणि मदत करतात, पण अनेकदा भ्रमक गावकऱ्यांना वेळकाळाचा विचार न करता अडचण निर्माण करताना अढळतांत. काहीं वेळा गावकऱ्यांकडून भ्रमकांच्या ऐवजाची चोरी झाल्याचेही ऐकू येते. हे सर्व टाळण्यासाठी काही [दुर्गभ्रमणाचे अनुबंध] पाळले तर भ्रमण सुखकारक आणि सर्वांच्या (भ्रमक व गावकऱ्यांच्या) सोयीचे होईल. भ्रमणाला जाताना आणि निवाऱ्याजवळच्या शेकोटीभोवती अनेक खास ट्रेकींगची गाणी म्हणतात आणि काही खास ट्रेकींगचे किस्से ही सांगतात. ह्या शब्दांवर टिचकी देऊन आपल्या खास गाण्यांचे व किश्श्यांचे योगदान करावr
प्रख्यात लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे ‘दुर्गभ्रमण गाथा ‘ हे पुस्तक या विषयी महत्त्वाचे आहे. अशी अन्य काही अधिक पुस्तके ही उपलब्ध आहेत.