दुनियादारी (चित्रपट)
दुनियादारी | |
---|---|
प्रमुख कलाकार | |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९ जुलै २०१३ |
दुनियादारी हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित असून याचे कॅमेरामन संजय जाधव यांनी त्यांच्या ड्रीमिंग २४/७ या संस्थेतर्फे केले आहे. जाधव यांनी चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या चित्रपटांचेही दिग्दर्शन केलेले आहे.
कलाकार
- स्वप्नील जोशी - श्रेयस तळवलकर
- सई ताम्हणकर - शिरीन घाटगे
- उर्मिला कानिटकर - मीनाक्षी इनामदार (मीनु)
- अंकुश चौधरी - दिगंबर शंकर पाटील (दिग्या) / डी.एस.पी
- जितेंद्र जोशी - साईनाथ देडगांवकर (साई)
- सुशांत शेलार - प्रीतम घाटगे (शिरीनचा भाऊ)
- रिचा परीयाल्ली - सुरेखा भाटे (दिग्याची प्रेयसी)
- नागेश भोसले - विनायकराव घाटगे (शिरीन व प्रीतमचे वडील)
- श्रीरंग देशमुख - दिवाकरराव देडगांवकर (साईचे वडील)
- उदय सबनीस - इन्स्पेक्टर रमेश इनामदार (मीनुचे वडील)
- वर्षा उसगांवकर - राणी माँ तळवलकर (श्रेयसची आई)
- उदय टिकेकर - सुधीर तळवलकर (श्रेयसचे वडील)
- संदीप कुलकर्णी - श्रेयस गोखले / एम.के. (राणी माँचा प्रियकर)
- आनंद अभ्यंकर - महाविद्यालयाचे प्राचार्य
- अजिंक्य जोशी - अशक्या
- नितेश काळबांडे - बंटी
- प्रणव रावराणे - साॅरी
- योगेश शिरसाट - श्री / सुनील
गाणी
या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांनी आपला आवाज दिला आहे.
- जिंदगी जिंदगी
- टिक टिक वाजते
- यारा यारा
- देवा तुझ्या गाभाऱ्याला