Jump to content

दीवची लढाई

दीवची लढाई
पोर्तुगीज मामलुक युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक फेब्रुवारी ३, इ.स. १५०९
स्थान दीव जवळ अरबी समुद्रात
परिणती पोर्तुगीजांचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
पोर्तुगीज साम्राज्यगुजरातचा सुलतान, मामलुक सुल्तानी, कोझिकोडचा झामोरिन, तुर्कस्तानी राखीव आरमार, ऑट्टोमन साम्राज्य, व्हेनिसचे प्रजासत्ताक, रागुसाचे प्रजासत्ताक
सेनापती
दॉम फ्रांसिस्को दि अल्मेडा अमीर हुसेन अल-कुर्दी, मलिक अय्याझ, कुंजाली मराक्कार
सैन्यबळ
१२ कराक, ६ कराव्हेल, १,३०० पोर्तुगीज सैनिक व खलाशी, ३०० नायर सैनिक व खलाशी ४० गुराबा, ८० इतर युद्धनौकांसह २५० लढाऊ नौका,

दीवची लढाई किंवा चौलची दुसरी लढाई ही फेब्रुवारी ३, इ.स. १५०९ रोजी लढली गेलेली आरमारी लढाई होती. अरबी समुद्रात दीव बंदराजवळ झालेल्या या लढाईत एका बाजूला पोर्तुगीज साम्राज्य तर विरोधात गुजरातचा सुलतान महमूद बेगडा, इजिप्तची मामलुक सुल्तानी, कोझिकोडचा राजा झामोरिन यांच्या युद्धनौका होत्या. एतद्धेशीय आरमाराला ऑट्टोमन साम्राज्य, व्हेनिस आणि रागुसाच्या प्रजासत्ताकाचे पाठबळ होते.[] या लढाईत पोर्तुगीजांचा निर्णायक विजय झाला व त्यांचा भारताला येण्याच्या समुद्रीमार्गातील अरब व भारतीय आरमारांचा अडसर दूर झाला. यानंतर पोर्तुगीजांनी भराभर पश्चिम भारतातील बंदरे काबीज केली व अरबी समुद्रावरील समुद्री वाहतूकीवर आपला वचक बसवला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Rogers, Clifford J. Readings on the Military Transformation of Early Modern Europe, San Francisco:Westview Press, 1995, pp. 299–333 at Angelfire.com