दीपा दासमुंशी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १५, इ.स. १९६० कोलकाता | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
दीपा दासमुंशी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. त्यांनी १५व्या लोकसभेत रायगंजच्या खासदार म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ पर्यंत त्या नगरविकास राज्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी प्रिया रंजन दासमुंसी यांच्या त्या पत्नी होत्या. २०१७ मध्ये प्रिया रंजन यांचा मृत्यू झाला.
प्रारंभिक जीवन
दासमुंसी यांचा जन्म १५ जुलै १९६० रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे बेनॉय घोष आणि दुर्गा घोष यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता येथील रवींद्र भारती विद्यापीठात झाले आणि त्यांनी नाट्यशास्त्रात एम.ए. केले आहे.[१]
त्यांनी १५ एप्रिल १९९४ रोजी प्रिया रंजन दासमुंशी यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आहे.[२]
दासमुंसी यांना पुस्तके वाचणे, बागकाम करणे, स्वयंपाक करणे आणि शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड आहे. त्यांनी जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. १९८४ पासून त्यांनी स्टेज परफॉर्मर, दूरचित्रवाणी कलाकार, वेशभूषाकार, व टीव्ही मालिका आणि लघुपटांचे कला दिग्दर्शक पण केले आहे.[३]
त्या दिल्ली महिला फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षा देखील होत्या.[४]
पदे भूषवली
- २००६-२००९: सदस्य, गोलपोखरसाठी पश्चिम बंगाल विधानसभा
- २००९-२०१४: रायगंजमधून 15 व्या लोकसभेवर निवडून आले
- ३१ ऑगस्ट २००९: सदस्य, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय यावरील संसदीय समिती
- २८ ऑक्टोबर २०१२ , केंद्रीय राज्यमंत्री, नगरविकास[५]
त्यांनी बेघर रस्त्यावरील मुले, अपंग मुले आणि आदिवासींसाठी समाजकार्य केले आहे.[४]
संदर्भ
- ^ "Detailed Profile: Smt. Deepa Dasmunsi". Government of India. 5 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-25 रोजी पाहिले.
- ^ 164.100.47.132 https://web.archive.org/web/20140228120945/http://164.100.47.132/LssNew/members/former_Biography.aspx?mpsno=4481. 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2014 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "Members : Lok Sabha".
- ^ a b "Biographical Sketch Member of Parliament 15th Lok Sabha". 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "29 - Goalpokhar Assembly Constituency". Partywise Comparison Since 1977. Election Commission of India. 2010-09-25 रोजी पाहिले.