Jump to content

दिव्य मराठी

दिव्य मराठी
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मालकD.B.Corp. Ltd
प्रकाशकदैनिक भास्कर वृत्तसमूह
स्थापना२९ मे २०११
भाषामराठी
किंमत४ रुपये, ५ रुपये (रविवार अंक)
मुख्यालयभारत औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
खप३,३७,००० प्रति
भगिनी वृत्तपत्रेदिव्य भास्कर,
दैनिक भास्कर

संकेतस्थळ: [१]


दिव्य मराठी हे भारतामधील दैनिक भास्कर ग्रुपचे महाराष्ट्र राज्यात वाचले जाणारे मराठी दैनिक आहे .

इतिहास

पहिला अंक

भारतामधील सर्वात मोठ्या मीडिया हाऊस म्हणजेच दैनिक भास्कर ग्रुपने १९५८ मध्ये भोपाळ येथून हिंदी आवृत्ती सुरू केली. २००३ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे गुजराती आवृत्ती सुरू करण्यात आली आणि त्यानंतर २९ मे २०११ रोजी दैनिक भास्कर ग्रुपने महाराष्ट्रामध्ये पुढचे पाऊल औरंगाबाद येथे टाकले आणि मराठी भाषेतील "दैनिक दिव्य मराठी" उदयास आले. सदर आवृत्ती सुरू करण्यापूर्वी ग्रुपतर्फे घरोघरी जाऊन सर्वे घेण्यात आला ज्यामध्ये १,४०,००० घरांना प्रत्यक्ष्य भेटी देण्यात आल्या आणि ८५००० प्रतींपासून महाराष्ट्रात निःष्पक्ष आणि निर्भीड असे दैनिक दिव्य मराठी सुरू झाले.

पहिले संपादक मंडळ

रमेशचंद्रजी अग्रवाल यांनी सन १९५८ला दैनिक भास्करची मध्य प्रदेशातील भोपाळ येथून सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गिरीश अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक झाले . दैनिक भास्करचे मुख्यालय भोपाळ येथे आहे. तर दैनिक दिव्य मराठीचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी दैनिक भास्कर ग्रुपचा, "The New York Times" (द न्यू यॉर्क टाइम्स) सारख्या दैनिकाशी सामंजस्य करार झालेला आहे. राज्य संपादकाची धुरा श्री.अभिलाष खांडेकर व श्री.प्रशांत दीक्षित यांनी सांभाळलीत्यानंतर पुढे श्री.संजय आवटे हे राज्य संपादक झाले. सध्या श्री प्रणव गोळवेलकर हे राज्य संपादक आहेत.

व्हिजन: हा सामाजिक बदल घडवणारा सर्वात मोठा मीडिया ब्रॅंड आहे.
कोअर व्हॅल्यूजचा वापर वेगवेगळ्या स्थानिक बातम्यांसाठी व लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी केला जातो.
बातम्यांमधून वाचकांना ज्ञान मिळायला पाहिजे व ते दुसऱ्या वर्तमानपत्रापेक्षा वेगळे असले पाहिजे, अशी डिपार्टमेंटल स्ट्रॅटेजी आहे.

'दिव्य मराठी' वृत्तपत्राच्या आवृत्त्या

दै. दिव्य मराठीच्या एकूण ६ आवृत्त्या असून त्यांची स्थापना वर्ष खालील प्रमाणे;

  १	 औरंगाबाद    - २९ मे २०११ 
  २	 नाशिक 	    - ३ जुलै २०११
  ३	 जळगाव     - ११ सप्टेंबर २०११ 
  ४	 अहमदनगर   - १६ ऑक्टोबर २०१२
  ५	 सोलापूर      - १ एप्रिल २०१२ 
  ६	 अकोला      -  १३ जुलै २०१३

विविध भाषेतून

एकूण ३ भाषेतून प्रसिद्ध होत असून १२ राज्यातून ६५ आवृत्या आहेत

  1. हिंदी भाषेत - दैनिक भास्कर
  2. मराठी भाषेत- दिव्य मराठी
  3. गुजराती भाषेत- दिव्य भास्कर

खास वाचकांसाठी

• राष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, स्थानिक घडामोडी व जिल्हास्तरीय घडामोडींच्या बातम्यांसोबत वाचकांसाठी क्रीडा, रंजन, व्यापार, भूमिका, विविध, देश - विदेश इ. अश्या शीर्षकांखाली माहिती दिलेली असते. • आठवड्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी व्हावी म्हणून दिव्य मराठीने दर सोमवारी “मंडे पॉझिटिव्ह अंक” ही संकल्पना मांडली सोबत "WEALTH" मध्ये गुंतवणूक व त्याविषयीची माहिती दिलेली असते आणि YOUGLE मध्ये शैक्षणिक , नोकरीविषयक तसेच परीक्षांबाबत सदर दिलेले असतात • दर मंगळवारी मधुरिमा हे महिलाविषयक सदर छापले जाते . • वाचकांसाठी सामाजिक,शैक्षणिक, मनोरंजनपर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात जसे हेल्थ एक्स्पो, प्राउड महाराष्ट्रीयन अवॉर्ड्स, पोलीस अवॉर्ड्स, दिव्य एज्युकेशन फेअर इ. आयोजित केले जातात.त्याचबोबर महिलांसाठी रातरागिणी हा एक महिलांसाठी पुढाकार घेण्यात आला ज्यामध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला • जिंका १५ कोटी या कार्यक्रमाद्वारे वाचकांसाठी स्पर्धा घेतली जाते त्याचबरोबर वाचकांसाठी वर्षभर अनेक स्पर्धा राबविल्या जातात

रचना

  • मुख्य अंक हा १४ पाने
  • दिव्य सिटी हा ४ पाने
  • दिव्य सिटी हे दर सोमवार व मंगळवारी ४ पानांचे व बुधवार, गुरुवार ,शुक्रवार, शनिवार व रविवार ६ पानी असते..
  • सोलापूर जिल्ह्यासाठी व सोलापूर सिटीसाठी स्वतंत्र आवृत्त्या छापल्या जातात.

वर्धापन दिन

२९ मे २०२० रोजी दै. दिव्य मराठीच्या प्रथम आवृत्तीने म्हणजेच औरंगाबाद आवृत्तीने आपला ९ वा वर्धापन दिन साजरा केला.

संदर्भ

  1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, तृतीयावृत्ती २००९ किमंत ७५०/-
  2. पत्रकारितेची मूलतत्त्वे - प्रा. डॉ. सुधाकर पवार : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक १३४०, तृतीयावृत्ती २०१२ किमंत १७५/-

बाह्य दुवे