दिवाकर मोहनी
दिवाकर मोहनी | |
---|---|
जन्म | १० नोव्हेंबर १९३१ नागपूर |
कार्यक्षेत्र | मुद्रण, देवनागरी लिपी |
पुरस्कार | भाषाव्रती पुरस्कार (२०१९) |
दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] आजचा सुधारक ह्या नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुद्रक म्हणून मोहनी ह्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मोहिनी राज मुद्रा, नागपूर हे त्यांचे मुद्रणालय होते.[१]
दिवाकर मोहनी यांनी लिहिलेली पुस्तके
- माय मराठी : कशी लिहावी ...कशी वाचावी?
- शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान
पुरस्कार
- दिवाकर मोहनी ह्यांना अखिल भारतीय मराठी-साहित्य-महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा भाषाव्रती हा पुरस्कार..[१]
- दिवाकर मोहनी यांना 'शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान' या पुस्तकासाठी विदर्भ साहित्य संघाचा डाॅ. वा.वि. मिराशी स्मृति पुरस्कार. (२०२०)
संदर्भ
- ^ a b c मोहनी, २०१९.
संदर्भसूची
- मोहनी, अनुराधा. "उचित सन्मान".
- मोहनी, दिवाकर. माय मराठी : ...कशी लिहावी ...कशी वाचावी.
बाह्य दुवे
- देवनागरीलिपीशी विविधांगांनी ओळख : भाग १ ते १५. यूट्यूबवरील दृक्श्राव्य सामग्री. रचना : दिवाकर मोहनी आणि सुनन्दा मोहनी