Jump to content

दिवाकर दत्तू शेणवी

आंबे दिनानाथ उर्फ दिवाकर दत्तू शेणवीयांचा जन्म २० एप्रिल १९२४ रोजी सदाशिवगड - कारवार येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव दत्तू उत्तम शेणवी. पुढे ते गोवा मुक्तीसंग्रामात सक्रिय झाले.१९४६ साली सेवादलात कवायती करण्यात ते प्रवीण झाले. त्यांनी १९५४ साली गोवा मुक्तीसंग्रामाशी संबंधित भिंतीपत्रके वितरीत केली. मडगावला २ फेब्रुवारी १९५५ झालेल्या सत्यग्रहात ते सहभागी झाले होते. तेव्हा पोर्तुगीजांनी त्यांना पकडले. लष्करी कोर्टाने ८ वर्षे सक्तमजुरी शिक्षा दिली. प्रतिदिनी ३० एस्कुद, असा दोन वर्षे दंड , १५ वर्षे नागरी हक्क रद्दबातल अशी शिक्षा ठोठावली. १९ जानेवारी १९८१ रोजी त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

  1. ^ शहासने, चंद्रकांत (२०१२). देशभक्त कोश. बहुजन साहित्य्धारा पुणे. pp. ७५७.