Jump to content

दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१५

दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१५
भारत
२०१३ ←
७ फेब्रुवारी २०१५→ २०२०

दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागा
बहुमतासाठी ३६ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता अरविंद केजरीवालकिरण बेदीअजय माकन
पक्ष आप भाजपकाँग्रेस
मागील निवडणूक २८ ३१
जागांवर विजय ६७
बदल २९ २८ ३५

दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या दिल्ली राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये दिल्ली विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मागील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीप्दावर आलेले व केवळ ४९ दिवस टिकलेले अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने ह्या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून सपशेल बहुमत मिळवले. भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला खाते उघडण्यात देखील अपयश आले. ७० पैकी ६३ जागांवरील काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. भारताच्या निवडणूक इतिहासामधील हा सर्वात दमदार विजयांपैकी एक मानला जातो.

संपूर्ण निकाल

e • d निकालांचे विश्लेषण[]
राजकीय पक्षध्वजजागा
लढवल्या
विजयबदल% of
जागा
मतेमत %बदल
मत %
आम आदमी पार्टी 7067 3995.7148,79,12754.3 24.81
भारतीय जनता पक्ष693 284.2828,91,51032.2 0.8
शिरोमणी अकाली दल10 1044,8800.5 0.5
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस700 808,67,0279.7 14.85
बहुजन समाज पक्ष700-01,17,1241.3-
इंडियन नॅशनल लोक दल 20-054,4640.6-
अपक्ष-0 1047,6230.5 -
कोणालाही मत नाही NANANANA35,9240.4NA
एकूण70मतदान 67.08 %

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Partywise Result". eciresults.nic.in. 2013-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे