Jump to content

दिलीपराज प्रकाशन

दिलीपराज प्रकाशन प्रा.लि. ही महाराष्ट्रातील प्रकाशन संस्था आहे. या संस्थेची स्थापना प्रा. द. के. बर्वे यांनी १९७१ मध्ये, ५० पैसे किंमत असलेल्या १५ पानी ‘छान छान नाटुकली’ या पुस्तकाचे प्रकाशन करून केली. या प्रकाशनाने २०१७ अखेर २५०० पुस्तके प्रकाशित केली आहेत. बालसाहित्याबरोबरच मोठ्यांसाठीचे कथासंग्रह, काव्यसंग्रह, समीक्षा, चरित्रे, विज्ञानकथा आणि सर्व प्रकारचे विचार प्रवर्तक आणि माहितीपूर्ण साहित्य प्रकाशित केले जाते. फक्त उच्च अभिरूची असलेले, संस्कृतीचे संवर्धन करणारे आणि निखळ मनोरंजन करणारे गुणवत्तापूर्ण साहित्य छापणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. दर्जेदार छपाई, बहुरंगी मुखपृष्ठ, रास्त किंमत आणि मराठी भाषिक लोक असलेल्या जगाच्या सर्व काना-कोपऱ्यात वितरण ही दिलीपराज प्रकाशनची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. संस्थेचा स्वतःचा प्रेस आहे. दिलीपराज प्रकाशनला भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००२ मध्ये, विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. संस्थेने प्रकाशित केलेल्या १०५ पुस्तकांना राज्य पारितोषिके प्राप्त झाली आहेत.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार यादी

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार[ संदर्भ हवा ]

  1. मा. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिलीपराज प्रकाशनाला जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार रु. २५,०००, प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णकमळ. (नोव्हें. २००२)[ संदर्भ हवा ]
  2. सौ. मधुमिता बर्वे यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (एफ. आय. पी.) कडून ‘सर्वोत्कृष्ट प्रकाशिका’ म्हणून भारताचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते पुरस्कार (१९९९).[ संदर्भ हवा ]
  3. आजपर्यंत ११८हून अधिक पुस्तकांना राज्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  4. Directorate of film Festivals - Best Book of cinema Award for Publisher (Moulik Marathi chitrageete) 4 National Film Award.[ संदर्भ हवा ]
  5. अ‍ॅड. अविनाश चाफेकर यांच्या ‘श्रीमद्भगवत गीतेची प्रस्थानत्रयी’ या ग्रंथांस महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्पेâ देण्यात येणारा वैâ. सोनोपंत दांडेकर पुरस्कार प्राप्त झाला. (जुलै २०१८)
  6. विलास मोरे यांच्या ‘संगणकाची गाणी’ या बालकवितासंग्रहास शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, जळगाव यांच्यातर्पेâ ‘तापी-पूर्णा’ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.[ संदर्भ हवा ]
  7. श्रीमती वासंतीबाई गंगाधर गाडगीळ न्यास-पुरस्कृत वै. मिलिंद गाडगीळ स्मृतिप्रित्यर्थ बालवाङ्मय पुरस्कार एकनाथ आव्हाड लिखित ‘आनंदाची बाग’ या पुस्तकाला देण्यात आला.[ संदर्भ हवा ]
  8. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७ शिशुसाहित्य - पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘गमती-जमतीच्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  9. महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कृत ‘पुष्पा पुसाळकर पुरस्कार २०१७’ श्री. राजीव बर्वे यांच्या ‘मनःस्पर्श’ या कवितासंग्रहास प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  10. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७  बालसाहित्य - प्रथम पुरस्कार म. वि. कोल्हटकर यांच्या ‘पाखरांची भाषा’ या पुस्तकाला प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  11. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७  बालसाहित्य - पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या ‘एकदा काय झालं’ या पुस्तकाला प्राप्त.
  12. श्रीपाद कुलकर्णी यांच्या ‘कुणाचं असं अन् कुणाचं तसं’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा             बालसाहित्य पुरस्कार प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  13. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१६ ललित साहित्य - प्रथम पुरस्कार राजीव बर्वे यांच्या ‘मनःस्पर्श’ या पुस्तकाला प्राप्त.
  14. धर्मराज निमसरकर यांच्या ‘अंतहीन’ या पुस्तकाला श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांचा वैâ. दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्राप्त. (२०१५)[ संदर्भ हवा ]
  15. म. वि. कोल्हटकर यांच्या ‘हळू गळू, पळू गळू व इतर कथा’ या पुस्तकाला आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी  यांचा पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृतीचा पुरस्कार प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  16. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ शिशुसाहित्य प्रथम पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘शहाणुल्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  17. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ बालसाहित्य प्रथम पुरस्कार आबा महाजन यांच्या ‘हिप हिप हुर्रेऽऽ’ या पुस्तकाला प्राप्त. [ संदर्भ हवा ]
  18. लेखक आबा महाजन यांच्या ‘टांगाटोली’ या पुस्तकाला जळगाव येथील ‘दलुभाऊ जैन वाङ्मय पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  19. लेखक आबा महाजन यांच्या ‘टांगाटोली’ या पुस्तकाला नाशिक येथील ‘वाङ्मयसेवा पुरस्कार'
  20. लेखक आबा महाजन यांच्या ‘लई मज्जा रे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  21. लेखक शरणकुमार लिंबाळे  यांच्या ‘झुंड’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘वि. स. खांडेकर’ पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  22. कवयित्री संगीता बर्वे यांच्या ‘खारूताई आणि सावलीबाई ’ या कविता- संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे’ पुरस्कार. [ संदर्भ हवा ]
  23. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ‘शेतीपूरक उद्योग’ या पुस्तकाला राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  24. सदानंद सिनगारे यांच्या ‘संधिकाली या अशा’ या पुस्तकाला राज्य शासनाचा माधवराव बागल पुरस्कार प्राप्त.[ संदर्भ हवा ]
  25. लेखक हेमंत जोगदेव यांच्या ‘असे आहे ऑलिम्पिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘यदुनाथ थत्ते’ पुरस्कार. [ संदर्भ हवा ]
  26. लेखिका डॉ. प्राची साठे यांच्या ‘जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरून’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘र. धों. कर्वे’ पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  27. लेखक रामचंद्र नलावडे यांना सन २०१४ या वर्षीचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त. (डिसेंबर १५)[ संदर्भ हवा ]
  28. लेखक सी. पं. खेर यांच्या ‘आर्थिक सुधारणांचे नवे पर्व’ या ग्रंथाला अर्थशास्त्र/राज्यशास्त्र या वाङ्मयप्रकारातील दहा हजार रुपयांचा पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  29. लेखक रघुवीर साखवळकर यांच्या ‘घर हीच प्रयोगशाळा’ या पुस्तकाला बाल-कुमार संमेलनाचा पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  30. लेखक रघुवीर साखवळकर यांच्या ‘मी आहे चौरस आहार’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  31. लेखिका सौ. सरिता वैद्य यांच्या ‘अफलातून बंड्या प्रधान’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  32. लेखक रमेश सहस्रबुद्धे यांच्या ‘चंद्र असा जिंकला’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  33. लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या ‘यशच्या कल्पक कथा’ या पुस्तकाला ‘दयार्णव कोपर्डेकर किशोरकथा’ पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  34. लेखक निरंजन घाटे यांच्या ‘निसर्गयात्रा’ या पुस्तकाला श्री. बा. रानडे विज्ञान पुरस्कार.
  35. लेखक ना. द. जोशी यांच्या ‘निसर्गपुत्र’ या पुस्तकाला पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर वाङ्मय पुरस्कार, रोख रु. २,०००, सन्मानचिन्ह व पत्र.[ संदर्भ हवा ]
  36. लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘हिंदू’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  37. लेखक हेमंत जोगदेव यांच्या ‘ऑलिंपिकमधील अ‍ॅथलेटिक्स’ या पुस्तकाला शाहूमहाराज पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  38. लेखक कॅ. राजा लिमये यांच्या ‘आपल्या सेनादलातील महावीर’ या पुस्तकाला सानेगुरुजी पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  39. लेखक प्रा. अनिल सोनार यांच्या ‘कविता : कच्ची, सच्ची आणि लुच्ची’ या पुस्तकाला नागपूर येथील ‘समाज प्रबोधन प्रतिष्ठानचा उत्कृष्ट समीक्षेचा राज्यस्तरीय पुरस्कार.’[ संदर्भ हवा ]
  40. लेखक श्री. विलास कांतिलाल मोरे यांच्या ‘चैत्र पालवी’ या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय बोलीभाषा साहित्य संमेलनात मानाचा पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  41. लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘तुका म्हणे’ पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  42. लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘खानदेश-कन्या स्मिता पाटील साहित्यसेवा पुरस्कार.’[ संदर्भ हवा ]
  43. दिलीपराज प्रकाशनाला लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकासाठी अखिल भारतीय मराठी साहित्यप्रकार २ साठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे प्रशस्तिपत्र.[ संदर्भ हवा ]
  44. लेखक प्रा. देवेंद्र पुनसे यांच्या ‘पांढरं सोनं’ या पुस्तकाला ‘तिफन’ पुरस्कार. २१,००० रुपये रोख, तिफन प्रतिकृती, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ.[ संदर्भ हवा ]
  45. लेखिका गिरिजा मुरगोडी यांच्या ‘अंतर्मुख’ या पुस्तकाला ‘गोमंतक मराठी अकादमी’तर्पेâ पुरस्कार, ५,००० रु. रोख.[ संदर्भ हवा ]
  46. लेखक डॉ. प. म. आलेगावकर यांच्या ‘शोध अलौकिक विचारांचा- नवनिर्मितीचा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  47. लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘उपल्या’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाकडून १,००,००० रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  48. लेखिका गिरिजा कीर यांच्या ‘नक्षत्रवेल’ या पुस्तकाला ‘आनंद’ पुरस्कार, २,००० रु. रोख व स्मृतिचिन्ह.[ संदर्भ हवा ]
  49. लेखिका गिरिजा कीर यांच्या ‘तू सावित्री हो’ या पुस्तकाला  ‘स्व. सौ. शशिकला आगाशे स्मृती बालवाङ्मय पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  50. लेखक कॅ. राजा लिमये यांच्या पुस्तकाला ‘विशेष गौरव’ पुरस्कार, ५,००० रु. रोख, शाल व श्रीफळ.[ संदर्भ हवा ]
  51. लेखिका डॉ.अश्विनी धोंगडे यांचे ‘संदर्भ स्त्री-पुरुष’ हे पुस्तक २००८-२००९ च्या द्वितीय वर्ष कला आणि एम. ए. मराठी भाग-१ तसेच संदर्भग्रंथ म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी नेमण्यात आले.[ संदर्भ हवा ]