दिलीप प्रभावळकर
दिलीप प्रभावळकर | |
---|---|
दिलीप प्रभावळकर २०१५ मध्ये | |
जन्म | ४ ऑगस्ट इ.स. १९४४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके |
कारकीर्दीचा काळ | १९७२ - चालू |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख नाटके | वासूची सासू, एक झुंज वाऱ्याशी, नातीगोती, हसवाफसवी |
प्रमुख चित्रपट | एक डाव भुताचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ सरकारनामा लगे रहो मुन्नाभाई |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार राजीव गांधी पुरस्कार नाट्यदर्पण, म. टा. सन्मान |
दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि 'चौकट राजा' आणि 'एक डाव भुताचा' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी 'आबा गंगाधर टिपरे ' म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या 'चिमणीव' मराठी रंगभूमीवरील, 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.
जीवन
उल्लेखनीय
कार्य
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट
|
|
|
| ||||
---|---|---|---|---|---|---|---|
२०१७ | दशक्रिया (चित्रपट) | मराठी | |||||
२०१६ | फॅमिली कट्टा | मराठी | |||||
२०१५ | गणवेश | मराठी | |||||
२०१४ | विट्टीदांडू | मराठी | |||||
२०१४ | झपाटलेला २ | मराठी | |||||
२०१४ | पोस्टरबॉयस | मराठी | जगन देशमुख (अप्पा ) | ||||
२०१३ | नारबाची वाडी | मराठी | नारबा | ||||
२०१२ | शाळा | मराठी | अप्पा | ||||
२०११ | देऊळ | मराठी | |||||
२०११ | मोरया | मराठी | |||||
२००८ | सरकारराज | हिंदी | |||||
२००८ | वळू | मराठी | |||||
२००६ | लगे राहो मुन्ना भाई | हिंदी | |||||
२००५ | पहेली | हिंदी | |||||
२००४ | अगं बाई अरेच्चा! | मराठी | |||||
२००३ | चुपके से | हिंदी | |||||
२००२ | एन्काउन्टर द किलिंग | हिंदी | |||||
१९९९ | रात्र आरंभ | मराठी | |||||
१९९७ | सरकारनामा | मराठी | |||||
१९९६ | कथा दोन गणपतरावांची | मराठी | |||||
१९९५ | बेकाबू | हिंदी | |||||
१९९३ | झपाटलेला | मराठी | तात्याविंचू | ||||
१९९२ | एक होता विदूषक | मराठी | |||||
१९९१ | चौकट राजा | मराठी | |||||
१९८७ | छक्के पंजे | मराठी | |||||
१९८२ | एक डाव भुताचा | मराठी | |||||
दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट
- गॉड ओन्ली नोज
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके
- अलबत्या गलबत्या
- आप्पा आणि बाप्पा
- आरण्यक
- एक झुंज वाऱ्याशी
- एक हट्टी मुलगी
- कलम ३०२
- घर तिघांचं हवं
- चूक भूल द्यावी घ्यावी
- जावई माझा भला
- नातीगोती
- नांदा सौख्यभरे
- पळा पळा कोण पुढे पळें तो
- पोर्ट्रेट
- बटाट्याची चाळ
- वाटचाल
- वासूची सासू
- विठ्ठला
- संध्याछाया
- सूर्याची पिल्ले
- हसवाफसवी
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम
- असंभव
- एका हाताची टाळी
- कथनी
- काम फत्ते
- घरकुल
- घेऊन टाक
- चिमणराव
- चिरंजीव
- चूक भूल द्यावी घ्यावी
- झोपी गेलेला जागा झाला
- टूरटूर
- नो प्रॉब्लेम
- बेरीज वजाबाकी
- राजा राजे
- श्रीयुत गंगाधर टिपरे
- साळसूद
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका
- अपना अपना स्टाईल
- गुब्बारें
- छोटा मूॅंह और बडी बात
- नॉक नॉक कौन हैं
एकपात्री
दिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात.
या एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.
दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके
- अनुदिनी
- अवतीभवती
- आवाज दिलीप प्रभावळकरांचा
- एका खेळियाने
- कागदी बाण
- गुगली
- चूकभूल द्यावी घ्यावी
- झूम
- दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका, भाग १ (ॲक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
- नवी गुगली
- बोक्या सातबंडे भाग १ ते १०
- हसगत
- हसवा फसवी (हे नाट्य आता पुष्कर श्रोत्री, सतीश जोशी व योगिनी पोफळे सादर करतात. २००वा प्रयोग १०-७-२०१६ला झाला)
- हाउज दॅट!
एकांकिका स्पर्धा
दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.
पुरस्कार
- आशियाई चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (३०-१-२०१८)
- गंधार पुरस्कार (१५-११-२०१८)
- गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक
- नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
- नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
- पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
- महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार. ('बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी)[१]
- शाहू मोडक पुरस्कर (२०१८)
- संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)
संदर्भ
- दिलीप प्रभावळाकरांचे संकेतस्थळ Archived 2007-01-29 at the Wayback Machine.
- मराठी नायक डॉट कॉम Archived 2007-02-19 at the Wayback Machine.
बाह्य दुवे
https://www.timeoutmumbai.net/film/features/interview-dilip-prabhavalkar[permanent dead link]
- ^ "..:: साहित्य अकादेमी - बाल साहित्य पुरस्कार ::." sahitya-akademi.gov.in. 2019-08-04 रोजी पाहिले.
- ^ "दिलीप प्रभावळकरांचा ! | मिसळपाव". www.misalpav.com.