दिलीप देविदास भवाळकर
दिलीप देविदास भवाळकर (ऑक्टोबर १६, १९४० - हयात) हे मराठी, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. लेसर तंत्रज्ञानामधील संशोधनाबद्दल त्यांची विशेष ओळख आहे. २००० साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना शास्त्रीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
जीवन
भवाळकरांचा जन्म ऑक्टोबर १६, १९४० रोजी सागर, मध्यप्रदेश येथे झाला. त्यांनी सागर विद्यापीठातून एम.एससी. पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यांनी युनायटेड किंग्डमातील साउदॅंप्टन विद्यापीठात पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी इंदूर येथील 'सेंटर ऑफ ऍडवान्स्ड टेक्नॉलॉजी' या संशोधनसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी काही काळ सांभाळली.