दिलीप जगताप
प्रा. दिलीप जगताप हे पुण्यात राहणारे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी ३० नाटके लिहिली असे त्यांनी एका लेखात म्हणले आहे.[ संदर्भ हवा ]
दिलीप जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वाईमधील एका छोट्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण त्याच गावातील द्रविड हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या शाळेतील कृष्णराव गणेश सबनीस या सरांमुळे जगताप यांच्या मनातील गणित येत नसल्याचा न्यूनगंड दूर झाला आणि सरांच्या प्रोत्साहनामुळे ते कविता आणि नाट्यलेखन करू लागले.
दिलीप जगताप यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.
इ.स. १९५० नंतरच्या काळात प्रयोगशील रंगभूमीसाठी नाट्यलेखन करणारे ते एक महत्त्वाचे लेखक समजले जातात.
१९७२ मध्ये सत्यदेव दुबे हे करत असलेल्या संशोधनाचा एक भाग म्हणून पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात ६ दिवसांची नाट्यलेखन कार्यशाळा आयोजित केली होती. तिच्यात नाटककार म्हणून दिलीप जगताप यांचा सहभाग होता.,
दिलीप जगताप यांची नाटके
- आला रे राजा
- एक अंडं फुटलं (प्रायोगिक नाटक)
- जा खेळायला पळ (प्रायोगिक नाटक, ह्या नाटकाला झी गौरव स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रयोग, दिग्दर्शन, अभिनेता, सहाय्यक अभिनेता, नेपथ्य, लेखन अशी सहा नामांंकने मिळाली होती.
- पूज्य गुरुजी
- मेले उंदिर
- रंगे हाथ
- राजदंड
- वारूळ (एकांकिका)
सन्मान
- भुसावळ येथे ३ मे २०१४ला सुरू झालेल्या खान्देश नाट्यमहोत्सवाचेे उद्घाटन प्रा. दिलीप जगताप यांनी केले होते.
- २४ ते २६ जुलै २००९ या काळात लेखक राजन खान व नाटककार दिलीप जगताप यांनी पाचगणीत लेखक-समीक्षकांचे मी संमेलन भरवले होते.
- २०११ च्या झी गौरव प्रायोगिक नाटक विभागात सर्वोत्कृषट नाट्यलेखनाचे पारितोषिक प्रा. दिलीप जगताप यांना मिळाले होते.