Jump to content

दिनकरराव जवळकर

दिनकरराव जवळकर
चळवळ: सत्यशोधक, ब्राम्हणेतर चळवळ
 सहकारी = केशवराव जेधे (प्रकाशक)
पत्रकारिता/ लेखन: कैवारी , तेज (साप्ताहिक )
धर्म: सत्यधर्म
प्रभाव: छत्रपती शिवाजीमहाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज
पत्नी: इंदूताई जवळकर
अपत्ये:


सत्यशोधक दिनकरराव जवळकर

महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राम्हणेतर चळवळ (१९१७ ते १९३७)पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी या गावचे शेतकरी होते. त्यांच्या शेतीचा शेवटचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या घशात गेला.[]

छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ’कैवारी’ नावाचे वृत्तपत्र काढून दिले. ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेतर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे नेते होते. पुण्यात त्यांनी व केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. लोकमान्य टिळक व कृष्णाशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहेत असे ते म्हणत. "टिळक हे तेल्यातांबोळ्यांचे नाही तर सनातनी ब्राम्हणाचे पुढारी होते. बहुजन समाजाला भटांनी पिळवणूक केली. त्यामुळे समाज मागे राहिला." अशी त्यांची मते होती.

वैचारिक साहित्य

त्यांनी इ.स.१९२५ साली 'देशाचे दुश्मन' नावाचे पुस्तक लिहिले.[] शेतकऱ्यांची कैफियत,जेधे-जवळकर, देशाचे दुश्मन (टिळक आगरकर टीका), जाहीर सवाल १ ला, सवाल २रा, मर्द हो नाके कापून घ्या, १९५० सालची ब्राह्मण परिषद, शेतकऱ्यांचे हिंदुस्थान, क्रांतीचे रणशिंग (शेतकऱ्यांना साम्यवादाचे महत्त्व), शिवस्मारक पुराण क्रांतीचे रणशिंग, असे विषय त्या पुस्तकात होते..

देशाचे दुश्मन नावाच्या पुस्तकाबद्दल ल.ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे फिर्याद केली. प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना-लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली. तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले. अपील चालवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोष सुटका केली.

लेखणीला तलवारीची धार

दिनकरराव जवळकर यांच्या लेखणीला तलवारीची धार होती, हे त्यांचे साहित्य वाचल्यावर कळून येते. अवघे ३४ वर्षाचे जीवनमान लाभलेल्या या महापुरुषांचा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजासारखाच धारदार होता. दिनकररावांचे शत्रू असलेले ब्राम्हण म्हणायचेच. हा माणूस जणू विषात बुडवून लेखणीने लिहितो आहे. एवढी जहरी लेखणी चालवणारे दिनकरराव जवळकर यांच्या म्हातोबाची आळंदी या गावी त्यांची जयंती व पुण्यतिथी परिवतर्न चळवळीचे पुरस्कर्ते साहित्यिक लेखक पत्रकार दशरथ यादव यांनी २००४ साली सुरू केली. पहिली जयंती चावडीत चाळीस पन्नसा लोकांच्यात साजरी करून दिनकरराव जवळकरांचे महत्त्व लोकांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांचा सहभागही वाढून दरवषी जयंती पुण्यतिथी साजरी होते. आळंदी हे सत्यशोथक चळवळीते शक्तीपीठ व्हावे असा प्रयत्न सुरू आहे. दहा कोटीचे दिनकररावांचे स्मारक व्हावे अशी मागणी श्री यादव यांनी केली. २००१ साली इंदूताई जवळकर यांना शिवाजीराव खैरे यांच्या सहकार्याने म्हातोबाच्या आळंदीत दिनकररावांचा मोठा उपक्रम राबविण्याचा यादव यांचा विचार होता. त्यावेळी गावातील लोकांना बोलावून बैठकही केली होती.....पण काही कारणामुळे ते घडू शकले नाही. पुढे जवळकारांची मात्र जयंती सुरू झाली. सत्यशोधक दिनकरराव जवळकर पत्रकारिता पुरस्कार दरवषी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने खानवडी येथे होणाऱ्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात दिला जातो... []

दिनकरराव जवळकर पुरस्कार

  1. ^ http://www.prabodhankar.com/book/भाग-३३-1 Archived 2011-12-20 at the Wayback Machine. मराठी मजकूर वेबसाईट पाहिले तारीख १३ जुलै २०१२
  2. ^ http://www.scribd.com/doc/26464206/Deshache-Dushman-by-Satyashodhak-Dinkarrao-Javalkar
  3. ^ http://www.prabodhankar.com/book/भाग-६-24[permanent dead link]