दिनकर गांगल
दिनकर गांगल हे थिंकमहाराष्ट्र.कॉम या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते पत्रकार असून त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना मिळालेल्या फीचर रायटिंग या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्प्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्तीच्या आधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्या साथीने ग्रंथाली या प्रकाशनसंस्थेची स्थापना केली. गांगल यांनी ग्रंथालीच्या रुची मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. शिवाय ग्रंथालीची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. गांगल यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये एस.टी. समाचार हे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.
गांगल हे ग्रंथालीप्रमाणे प्रभात चित्र मंडळाचे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे.
पुस्तके
- कॅन्सर डायरी (लेखन-संपादन)
- भारतातील स्टेनलेस स्टील संस्कृतीचे जनक (सहलेखिका शरयू ठाकूर)
- माया माध्यमांची
- शोध मराठीपणाचा (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन)
- स्क्रीन इज द वर्ल्ड
पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार
- मुंबई मराठी साहित्य संघ व मराठा साहित्य परिषद यांचे संपादनाचे पुरस्कार
- वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार