दिति
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दिति (मराठी लेखनभेद: दिती; संस्कृत: दिति) ही कश्यपाची पत्नी व दैत्य वंशाची माता होती. महाभारतमते ही दक्ष प्राचेतस प्रजापतीची कन्या होती[१].
वंश
कश्यपापासून दितीला झालेले पुत्र दैत्य या मातृक नावाने संबोधले जातात. वाल्मीकि रामायणानुसार तिच्या पुत्रांनी, म्हणजेच दैत्यांनी अमृतप्राप्तीसाठी देवांशी युद्ध केले. या युद्धात दितीचे सर्व पुत्र मारले गेले. त्यामुळे तिने इंद्रविनाशक पुत्रप्राप्तीसाठी कश्यपाची १,००० वर्षे तपस्या केली व त्यातूनच तिने सात मरुत्गणांना जन्म दिला[१].