दिगंत आमटे
बाबा आमटे, डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेल्या सेवाकार्याचा वसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ.दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत.[१]
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी प्रकल्पाच्या' माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत.[ संदर्भ हवा ]
त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. आरोग्य, शिक्षणाशी त्यांची ओळख झाली. हेमलकसा प्रकल्प आदिवासींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. आदिवासींचे हक्काचे घर म्हणून हा प्रकल्प आता जगभरात ओळखला जातो. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव व स्नुषा, डॉ. दिगंत-डॉ. अनघा आमटे यांनी आता हेमलकसाची जबाबदारी घेतली आहे. ते रुग्णालय सांभाळतात. त्यांची दोन छोटी मुले अन्वर्थ आणि आहान येथे आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रकाश आमटेंचा अनिकेत हा दुसरा मुलगा अभियंता आहे. अनिकेत आणि त्यांची पत्नी पल्लवी (समीक्षा) आमटे हे लोकबिरादरी प्रकल्पाचे व्यवस्थापन, आर्थिक ताळेबंद आणि शैक्षणिक कामे बघतात. त्यांनाही निर्जरा आणि रुमानी नावाची मुले आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रकाश आमटेंचे बंधू डॉ. विकास आणि त्यांची पत्नी डॉ. भारती आमटे यांनीही बाबा आणि साधनाताईंनंतर ‘आनंदवना’च्या सेवाकार्याचा वारसा तेवढ्याच समर्थपणे आणि आत्मीयतेने सांभाळला. येथील कुष्ठरोग्यांना, वंचितांना बाबा-ताईंची उणीव भासू दिली नाही. डॉ. विकास आमटे यांनी सोमनाथ प्रकल्प यशस्वीपणे उभा केला. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग येथे होतात. येथील श्रमसंस्कार छावणी तर जगभरातील युवकांना प्रेरणादायी ठरली आहे.[१]
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे
बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र. डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ रोजी झाला. गडचिरोली जिल्हयाच्या पूर्वेला छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागडच्या निबीड अरण्यात ४३ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ला कर्मयोगी बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणा, निरक्षरता यांच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासींना प्रकाशमान करण्यासाठी डॉ.प्रकाश आमटे लोकबिरादरी प्रकल्पाचे काम हाती घेतले. भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरू आहे.[२]
लोकबिरादरी आश्रमशाळेतून बाराखडी गिरविलेले अनेक माडिया तरुण डॉक्टर, अभियंते, वकील झाले. मा.बाबा आमटे त्यांना डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेल्या सेवाकार्याचा वसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ.दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत. २००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.[३]
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी तर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत. त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.[२]
आनंदवन
आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे. कायद्याचे पदवीधर मुरलीधर देविदास आमटे. सुखवस्तू कुटुंबातील. त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरविली होती. समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांवर त्यांची दृष्टी पडली. त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. जगण्याचा मार्ग मिळाला. सुखकर आयुष्य सोडून ते १९४९ मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली.[३]
त्या वेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या. साधनाताईही सुखवस्तू कुटुंबातील; परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा, त्यांची आसवे टिपणारा फकीर, जोडीदार म्हणून निवडला. प्रारंभीच्या दिवसांत आनंदवन म्हणजे साप, विंचू यांचे घर होते. सर्वत्र दलदल. सोबत काळोख. अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले. अनेक कठीण प्रसंग आलेत; मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत. अशा वेळी त्यांच्यासमोर रक्ताच्या नात्यांनी, समाजाने बहिष्कृत केलेली माणसे दिसायची. त्यांच्या डोळ्यांतील आसवे दिसायची. त्यांच्या दुःखात स्वतःला सामावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे. कालांतराने हजारो माणसे जुळत गेली. आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. मात्र, आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे.[३]
संदर्भ
- ^ a b काकडे, प्रमोद. [read:https://www.esakal.com/saptarang/anandwan-amte-family-63843 "माणूस घडविणारे विद्यापीठ"] Check
|दुवा=
value (सहाय्य). 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. - ^ a b बनगीनवार, संगीता. "समंजस स्वीकार". 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c वेलणकर, संजीव. "समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे". https://www.marathisrushti.com. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)