Jump to content

दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया

दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ असून मुळात तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. याच महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पुस्तक आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.[]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य

संदर्भ

  1. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1925). The Evolution of Provincial Finance in British India: A Study in the Provincial Decentralization of Imperial Finance (इंग्रजी भाषेत). P. S. King & Son, Limited.