Jump to content

दासगाव

  ?दासगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९.९४२१ चौ. किमी
• २०८.१२३ मी
जिल्हारायगड
लोकसंख्या
घनता
३,४१४ (२०११)
• ३४३/किमी
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 401102
• +०७७६२

दासगांव हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. वीर रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या या गावात कोकण रेल्वेचा सर्वात पहिला बोगदा लागतो. या गावामध्ये असलेल्या डोंगरावर दौलतगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे गाव मुंबई-गोवा महामार्गालगत असून कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानकापासून महाडकडे जाताना केवळ ४ कि.मी.अंतरावर आहे. संपूर्ण हरितपट्टा, बारमाही वाहणारी सावित्री नदी, कोकण रेल्वेचा पूल यासारख्या अनेक गोष्टींमुळे वर्षाच्या बाराही महिने या गावचे दृश्य विलोभनीय दिसते. या गावामध्ये भोई समाजाची लोकसंख्या जास्त आहे. शेती हा या गावातील लोकांचा प्रमुख व्ययसाय असून गावातील बरेचसे लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई व इतर महत्त्वाच्या शहरात स्थायिक झाले आहेत.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/