दालबाटी
ही एक पारंपारिक राजस्थानी पाककृती आहे.
साहित्य
गहू एक किलो ,पावशेर मका जाडसर दळून आणावे.
वरण (संबर) करण्यासाठी :- तुरडाळ दीडवाटी, टोमेटो चार, बटाटे दोन, कशी फळ, कोथंबीर,
कृती
बटीच भिजवण्यासाठी पीठ प्रथम चाळून घ्यावे, त्यात छोटे दोन चमचे ओवा व जिरे बारीक करून टाकावे नंतर दोन मोठे चमचे तेलाचे मोहन कढईत गरम करून पिठावर पसरवून टाकावे. खाण्याचा सोडा छोटा एक चमचा टाकावा, पीठ चांगले मळून घ्यावे. पाच मिनिटे भिजू द्यावे. एका मोठ्या पातीलयात तीन तांबे पाणी टाकावे, पातील्यावर बसेल अशी चाळणी ठेवावी किवा पातळसर कपडा बांधावा. कणकीचे गोल गोल गोळे करावे व ते पाणी उकळलयास चाळणीवर ठेवावे. वरून ताट झाकण ठेवावे. बाटी चांगली उकडून घ्यावी. थंड झाल्यावर कढईत तेल गरम करून बाटी खमंग लालसर तळून घ्यावी.
वरण:- शिजवून घेतलेली दाळ फेटून घ्यावी. कढईत तेल गरम करून मोहरी,जिरे टाकावे चविनुसार तिखट,मीठ गरम मसाला टाकावा.पाणी व शिजवून घेतलेली डाळ टाकावी.
गरम बाटी व वरण तयार, वाढताना बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथंबीर वाढावी.[१]
संदर्भ
- ^ "Dal Bati Recipe Daal Baati दाल बाटी (Dal Batti)". Indian Vegetarian Recipes in Hindi | NishaMadhulika.com (हिंदी भाषेत). 2007-10-17. 2018-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.