Jump to content

दाराशा नौशेरवान वाडिया

प्रा दाराशा नौशेरवान डी.एन. वाडिया (२५ ऑक्टोबर, १८८३ – १५ जून, १९६९) हे भारतातील एक भूगर्भशास्त्रज्ञ होते. त्यांनी हिमालयाच्या भूगर्भावर त्यांनी संशोधन केले. हे संशोधन भारताच्या भूगर्भीय अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मानार्थ हिमालयीन भूगर्भशास्त्र संस्थेचे नाव १९७६मध्ये वाडिया हिमालयीन भूगर्भशास्त्र संस्थान असे करण्यात आले. डी.एन. वाडिया यांनी लिहिलेले व १९१९ साली प्रकाशित झालेले द जिओलॉजी ऑफ इंडिया हे पुस्तक भारतीय शैक्षणिक संस्थांत पाठ्यपुस्तक म्हणून अजूनही वापरले जाते.