दादा गोरे
दादा गोविंदराव गोरे (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ पैठण, औरंगाबाद - ) हे एक मराठी लेखक आहेत.
शिक्षण
एम.ए.पीएच.डी. बी.एड. बी.जे.
अभ्यासक्रम/मानसन्मान/पद
१. पीएच. डी. मार्गदर्शक : अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १९८७ ते २००७.
आ) भारतीय सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्था, परभणी, २००२ ते २००७.
२. (यू.जी.सी.) पद्व्युत्तर अध्यापन : विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद केंद्रा अंतर्गत संशोधन तज्ज्ञ समिती सदस्य.
३. मराठी अभ्यास मंडळ सदस्य : अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १९९१ ते २००७.
आ) उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, १९९९ ते २००४.
४. फॅकल्टी ऑफ आर्ट्स सदस्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १९९१ ते १९९९, २००५ ते २००७.
५. अधिसभा सदस्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १९९९ ते २००४.
६. मराठी परीक्षा मंडळ सदस्य : इ) कर्नाटक विद्यापीठ, धारवाड, १९९८ ते २००१ आणि २००६ ते २००७.
७. निमंत्रक, मराठी अभ्यास मंडळ : म. रा. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, १९९८ ते २००७.
८. सदस्य, अकॅडमिक कॉंन्सिल : म. रा. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, १९९८ ते २००७.
९. सदस्य : संशोधन समिती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, २००३.
१०. सदस्य : महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ.
११. सदस्य : लेखा व वित्त समिती, आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
पीएच. डी. पदवीसाठी संशोधन पूर्ण झालेले विद्यार्थी
१. डॉ. भीमराव वाघचौरे, ‘रा. रं. बोराडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’, मार्च १९९४.
२. डॉ. साहेब खंदारे, ‘मराठवाड्यातील ललित वाङ्मय : प्रेरणा व स्वरूप - १९०० ते १९४८’, जून १९९७.
३. डॉ. मनीषा दिवाकर रावते, ‘बी. रघुनाथांच्या साहित्यातील प्रादेशिकतेचे स्वरूप’, एप्रिल २००२.
४. प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, ‘आनंद यादव यांचे ललित गद्य लेखन : स्वरूप व चिकित्सा’, एप्रिल २००२.
५. डॉ. रमेश जाधव, ‘ग्रामीण साहित्यातील रंजकता आणि वास्तवता’, मार्च २००३.
६. डॉ. बी. डी. राठोड, ‘मराठवाड्यातील बंजारा लोकगीते व दंतकथा यांचा वाङ्मयीनदृष्ट्या चिकित्सक अभ्यास’, डिसेंबर १९९७.
७. डॉ. अंजली उस्तुरीकर, स्त्रीवादी भूमिकेतून गौरी देशपांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’.
८. डॉ. संजय मून, ‘दलित कवितेची शैली’, जून २००२.
९. डॉ. शिल्पा म्हात्रे, ‘स्त्रीवादी भूमिकेतून सानिया यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’, जून १९९९.
१०. डॉ. ललित (लक्ष्मण) अधाने, ‘रत्नाकर मतकरी यांचे ललितगद्य : स्वरूप आणि चिकित्सा’.
११. डॉ. अनिरुद्ध मोरे, ‘बाबा भांड यांचे ललित लेखन : एक चिकित्सक अभ्यास’
१२. डॉ. शिवाजी पाटील, ‘संतांची कूटरचनांचा चिकित्सक अभ्यास’.
१३. डॉ. सविता खोकले, ‘ज्योत्स्ना देवधर यांच्या ललित साहित्याचा चिकित्सक अभ्यास’
१४. डॉ. पी. विठ्ठल , ‘मराठवाड्यातील कवयित्रींची कविता’
१५. डॉ. भारती भांडेकर, ‘ना. सं. इनामदार यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यां’
१६. डॉ. समाधान इंगळे, ‘अनुराधा पाटील आणि निरजा यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास’
१७. डॉ. यशोद पाटील, ‘गो. नी. दांडेकर : चरित्रात्मक-ऐतिहासिक कादंबरी’
१८. डॉ. कैलास अंभुरे, ‘साहित्यिकांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा अभ्यास (१९७० ते २००५)’, मार्च २०११.
१९. डॉ. रमेश रावळकर, ‘स्त्री कथालेखिकांचा अभ्यास’
२०. डॉ. चंद्रसेन आवारे, ‘१९९० नंतरच्या स्त्रीलेखिकांची आत्मचरित्रे’
प्रकाशित ग्रंथ
१. समीक्षा
१. गोनीदांची प्रदेशिक कादंबरी(१९८७),
२. एतिहासिक चरित्रात्मक कादंबरी (१९९१),
३. साहित्य : समीक्षा आणि आस्वाद (१९९७),
४. गोनीदांची कादंबरी (१९९८),
५. साहित्यरूप [२००३(पुणे मसाप म.भि.चिटणीस समीक्षा पुरस्कार)],
२. कथासंग्रह
१. कोसळ (१९७६),
२. पौरुष (१९८३),
३. कोसळ आणि इतर कथा (१९९४)
४. अंगठा (२००७)
३. नाटके
१. नयनपंख (१९८९)
४. संपादन
१. मुक्तेश्वरांचे हरिश्चंद्राख्यान (१९७७), २. मराठवाड्याचा काव्यपरिमल (१९८३), ३. महदंबेचे धवळे (१९९०), ४. महात्मा फुले यांची कविता (१९९७), ५. साहित्यलेणी (१९९८), ६. वेणुसुधा (१९९८), ७. अभंगवाणी (१९९८), ८. छगनभाउ : लावणी आणि पोवाडे (१९९८), ९. आधुनिक भाषाशास्त्र आणि मराठी भाषा (१९९९), १०. मराठी संतांचे अभंग (२००३), ११. निवडक बखर वाङ्मय (२००३), १२. मुक्तेश्वराचे हरिश्चंद्राख्यान (२००३), १३. अनुराधा पाटील यांची कविता (२००६), १४. पानिपतची बखर (२००७), १५. तीर्थावळीचे अभंग व दमयंती स्वयंवरख्यान (२००७) इ.