Jump to content

दही मेथीची चटणी

मेथीच्या सेवनाने स्त्रियांचा अशक्तपणा दूर करून त्या सुदृढ बनतात व त्यांचा जठराग्नी प्रदीप्त होतो. मेथी आमटी-भाजीच्या फोडणीत नेहमी वापरली जाते. वातनाषक औषधी म्हणून मेथीचा उपयोग केला जातो. पाण्याचा निचरा होणारी व काळी जमीन पण. मेथीला अनुकूल असते. मेथीची लागवड भारतात सर्वत्र होते. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. राजस्थानात मेथी दाण्याचीही भाजी करतात. मेथी मध्ये जे तेल असते त्याचा वात नाडी वर सुयोग्य परिणाम होतो. मेथ्याचे लाडू, बेसन घालून भाजी, लसूण फोडणी घालून केलेली तुरीच्या डाळीचे वरण असे भरपूर पर्यत मेथी सोबत उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल हॉटेल्स मध्ये सर्रास कसुरी मेथीचा वापर होतो. मेथीची एक खास चव आहे तो तिचा पानातला कडवट पण पदार्थांना वेगळीच लज्जत आणतो.

साहित्य

कृती

मेथ्या तेलावर परतुन घ्या व लाल होऊ द्या. पोळपाट-लाटणे वर किंवा मिक्सर वर बारिक करा. भरडलेल्या मेथीत दही, साखर आणि मीठ मिसळा. आवडत असेल तर कोथिंबीर बारिक चिरून टाका. ही चटणीपराठे, खाकरे, वरण भात, खिचडी, बटाटे वडा, उडीद वडा आणि चकली बरोबर छान लागते.

फायदे

  • दह्यामुळे लेक्टिक एसिड मिळते.
  • मेथ्या पाचक व वातहारक आहेत.
  • मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे .
  • मेथी कृमी, शूळ, गोळा, संधिवात, कंबरेचे दुखणे, चमक येणे इ. विकारांवर गुणकारी असते .
  • मेथी वातांवर अत्यंत उत्तम समजली जाते.
  • सुश्रुत मेथीला रक्त शुद्ध करणारी समजतात.
  • मेथी रसधातूला बलवान बनवते.
  • मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असते.

संदर्भ

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo