Jump to content

दहिवडी महाविद्यालय (दहिवडी)

रयत शिक्षण संस्थेने १९६५ साली दहिवडी या ठिकाणी महाविद्यालय सुरू केले आहे. पाण्याची भीषण टंचाई, सततचा दुष्काळ, शेतीची अत्यंत कमी उत्पादकता अशी माण तालुक्याची ओळख आहे. उच्च शैक्षणिक सोयी शिवाय या भागाचा विकास होणे शक्य नाही हे ओळखून संस्थेने या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणामुळे कायम दुष्काळी भागातील अनेक घरांमध्ये आर्थिकदृष्ट्या नंदनवन फुलले आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, बी. सी. ए. अश्या विभागातील तसेच दुरशिक्षण , मुक्त विद्यापीठ द्वारे विविध शैक्षणिक सोयी या महाविद्यालयात उपलब्ध आहेत.