Jump to content- कालावधी - १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
- योजना खर्च - नियोजित खर्च =१५,२५,६३९ कोटी ₹
- प्रत्यक्ष खर्च = १६,१८,४६० कोटी ₹
दहाव्या योजनेची लक्ष्ये
- जी.डी.पी.च्या वाढीच्या दराचे लक्ष्य - प्रतिवर्ष ८ टक्के
- दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण २००७ पर्यंत २१ टक्के तर २०१२ पर्यंत ११ टक्के पर्यंत कमी करणे.
- २००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर १६.२ टक्के पर्यंत कमी करणे.
- साक्षरतेचे प्रमाण २००७ पर्यंत ७५ टक्के पर्यंत तर २०१२ पर्यंत ८० टक्के पर्यंत वाढविणे.
- बालमृत्यू प्रमाण २००७ पर्यंत दर हजारी ४५ पर्यंत तर २०१२ पर्यंत दर हजारी २८ पर्यंत कमी करणे.
- माता मृत्यू प्रमाण २००७ पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे २ तर २०१२ पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे १ पर्यंत कमी करणे.