दसूर
दसूर हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात वसलेले आहे.
?दसूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
लोकजीवन
येथे मुख्यतः मुसलमान, बौद्ध, नवबौद्ध,कुणबी, ब्राह्मण मराठा समाजातील लोकांची वस्ती आहे. दसूरच्या उजवीकडून मुचकुंदी नदी वर्षभर वाहात असते त्यामुळे मासेमारी हा व्यवसाय निसर्गतःच किरकोळ प्रमाणात केला जातो. शेती बागायती बरोबरच दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसायही थोड्या प्रमाणात केला जातो. खैराच्या जंगली झाडापासून काथ बनविण्याचा व्यवसाय हा पावसाळ्याअगोदरच्या हंगामात चालू असतो.नदीच्या तीरावर एक मुसलमान धर्माचे प्रार्थना स्थळ आहे.
मुचकुंदी नदीच्या विरुद्ध तीरावर साटवली गाव वसलेले आहे.
हवामान
उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात शीतल थंड, तर पावसाळ्यात समशीतोष्ण असे हवामान आहे. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात येथे पाऊस पडतो. येथे हापूस आंबा, काजू, रातांबा,फणस ह्यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन घेतले जाते.